यशस्वी भव !

                    २०१५ मध्ये “पद्मश्री” मिळवणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये एक नाव होतं अनुरीमा सिन्हा; Mount Everest सर करणारी जगातील पहिली दिव्यांग महिला. २०११ मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात तिचा एक पाय कापावा लागला. डॉक्टरांनी तिला कृत्रिम पाय बसवला. आता चालायचं कसं हा प्रश्न तिला पडायला हवा होता. पण त्याउलट, तिने थेट Mount Everest वर चढण्याचा निश्चय केला.  हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर सर्वात आधी तिने बच्चेन्द्री पालची भेट घेतली. बच्चेन्द्री पाल हि १९८४ मध्ये Everest सर करणारी पहिली भारतीय महिला. भेटीदरम्यान बच्चेन्द्रीपालने तिला दिलेलं उत्तर होतं, “अनुरीमा, ज्या दिवशी Mount Everest सर करायचं तुझ्या मनात आलं, त्या दिवशीच तू Everest सर केलेला आहेस, आता लोकांना फक्त त्याची तारीख कळायची बाकी आहे.” त्यानंर दोनच वर्षांनी म्हणजे २१ मे २०१३ मध्ये अनुरीमाने Everest सर करून एक नवीन इतिहास घडवला. “Born again on the Mountain” या  आपल्या पुस्तकाचे २०१४ मध्ये श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते तिने प्रकाशन केले. पाय गमवावा लागल्यानंतर आलेले जवळच्या व्यक्तींचे अनुभव, त्यातूनच आयुष्य संपलेले नाही हे जगाला दाखवण्याची तिला वाटलेली गरज आणि Everest सर करतांना आलेल्या अडचणींना तिने कसे तोंड दिले याचे कथन या पुस्तकामध्ये तिने केले आहे. पाय कापावा लागल्यानंतर बदललेल्या आयुष्याला स्वीकारायलाच एखाद्याला जिथे दोन वर्ष लागतात त्याच दोन वर्षात तिने Everest वर पाऊल ठेवले. दुर्दम्य इच्छाशक्तीचे हे एक उदाहरण म्हणावे लागेल. काय असेल तिच्या या यशाचे रहस्य?

             बच्चेन्द्री पालने तिला दिलेले उत्तर जर तुम्ही पुन्हा वाचले तर तुम्हाला थोडा अंदाज येईल. “अनुरीमा, ज्या दिवशी Mount Everest सर करायचं तुझ्या मनात आलं, त्या दिवशीच तू Everest सर केलेला आहेस”. हे शब्द तिने बच्चेन्द्री पालच्या तोंडून ऐकले. या उत्तराने तिच्या उत्साहात आणखीनच भर पडली. आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास तिच्यामध्ये जागा झाला. ती तयारीला लागली. तिचे सर्व विचार त्या ध्येयाच्या दिशेने कार्यान्वित झाले. Everest वर पोहोचली असल्याची कल्पना ती रोज मनाशी करू लागली. शरीराचा एखादा अवयव निकामी झाला म्हणून माणूस अपंग होत नाही हे सिद्ध करण्याची तिची ईच्छा आणि ती Everest वर उभी असल्याची रोज करत असलेली कल्पना हया दोन्हीगोष्टी एकजीव बनल्या होत्या. आणि हेच तिच्या यशाचे रहस्य होते.

            ईच्छा आणि कल्पना (रोज मनात येणारे विचार) यांचा मेळ बसलेली व्यक्ती कृत्रिम पाय लाऊनहि Everest ची चढाई जिंकू शकते पण हाच मेळ न घालता आल्यामुळे आपण मात्र आपल्या जवळची माणसं किंवा एखादा प्रसंग जिंकू शकत नाही आणि मग  आपण अपयशी ठरतो आहोत असं उगाच आपल्याला वाटू लागते.

             मित्रांनो, अपयश हा शब्द मुळी अस्तित्वातच नाही. त्याउलट, या सृष्टीवर जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाकडे बघा, त्याला उन्नतीचा, प्रगतीचाच ध्यास असतो. उत्क्रांतीची प्रक्रिया जर समजून घेतली तर निसर्गाने प्रत्येक जीवाला विकसित होण्यासाठी मदतच केली आहे आणि त्याच मदतीचा भाग म्हणून उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक जीवाला Life-Tools बहाल केलेले आहेत. आपल्या सभोवताली आढळणारा प्रत्येक जीव कित्येक युगांचा प्रखर संघर्ष करून येथपर्यंत पोहोचला आहे, त्या संघर्षातून बरेच काही शिकला आहे. आलेल्या अनुभवातून प्रत्येक जीवाने स्वतःमध्ये बदल केले आहेत आणि हे बदल यशस्वीपणे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करण्यासाठी निसर्गाने पुन्हा त्याला मदतच केली आहे; उदाहरणार्थ बर्फाळ प्रदेशात आढळणारे प्राणी ज्यांना थंडीपासून वाचण्यासाठी शरीरावर केसं उगवले. मला इथे हे सांगायचे आहे कि एक विलक्षण विश्व-शक्ती काही नियमांच्या अधीन राहून आपल्याला सतत यशस्वी होण्यासाठी मदत करत असते. हे तेच नियम आहेत, जे आकाशाला भिडणाऱ्या महाकाय वृक्षाला एका छोट्याश्या बिजामध्ये सामाऊन घेतात आणि त्याच नियमांनुसार त्या इवल्याशा बीजापासून पुन्हा महाकाय वृक्ष बनतो. हे तेच नियम आहेत, जे अंधारात सापडलेल्या वृक्ष-वेलींना प्रकाशाकडे झेपावण्याची प्रेरणा देतात कारण अन्न प्रकाशातच मिळणार आहे हे त्या जीवाला या नियामांनीच सूचित केललं असत. हे तेच नियम आहेत, ज्यांच्या अधीन राहून नुकतच जन्मलेलं प्रत्येक पिल्लू आईचं दुध प्यायला लागतं. जिवंत राहण्यासाठी हे आवश्यक आहे हे त्याला कोण सुचवत असेल असं तुम्हाला वाटतं? हे विश्व आपल्यासाठी सर्व शक्ती एकवटून अखंड, अविरत कार्यरत असत. “तुम अगर कोई चीज दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हे उसे मिलाने में लग जाती है,” शाहरुख खानच्या या वाक्यावर मल्टिप्लेक्समध्ये आपण टाळ्या वाजवतो आणि खुश होऊन घरी जातो. त्या वाक्याचा संदर्भ काय? ते खरं असेल का याचा विचार करण्याची आपल्याला गरजहि वाटत नाही. कित्येक वर्षांपासून व्हील-चेअर वर अडकून राहिलेले Dr. Stephan Hawkings अंतराळात काय घडत आहे हे समजू शकतात, तसे सुतोवाचहि ते जगाला देत राहतात आणि शरीराने धडधाकट असलेले आपण मात्र आपल्याच घरात किंवा ऑफिसमध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध कशा घडतात हे समजू शकत नाही. असं का होत असेल?

                                          spirituality

                         आजपर्यंत मानवाने लावलेले सर्व शोध जर अभ्यासले तर काय दिसतं? आपलं जीवन सुखकर करणारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सर्वच शोध कोणत्या ना कोणत्या नियमावर आधारित आहेत. गुरुत्वाकर्षणाचा नियम, उर्जा-अक्षय्यतेचा नियम, जडत्वाचा नियम, विद्युतवहनाचा नियम, गतीचे नियम, अनुवान्शिकतेचा नियम ई. प्रत्येक शोधाच्या मुळाशी आपल्याला कोणता तरी नियमच सापडेल. हे नियम आधीपासूनच  अस्तित्वात होते. या शास्त्रज्ञ लोकांनी ते शोधून काढले एवढंच. हे विश्व-नियम करतात काय? तर चराचर-श्रुष्टीमध्ये सुव्यवस्था स्थापित करतात. प्रत्येक जीवाला उन्नतीसाठी मदत करतात.  यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व tools आपल्यामध्ये वेळोवेळी fit करत राहतात कारण आपण यशस्वी व्हावं हाच या विश्वाचा उद्धेश आहे. यश, मग ते नात्यातले असो किंवा हाती घेतलेल्या एखाद्या कामातले, त्याच्या निर्मितीचे अधिकारही सुदैवाने आपल्यालाच दिलेले आहेत. तरीही आपल्याला इच्छित यश का मिळत नाही? कारण आपण त्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहोत. त्यातल्या काही प्रमुख नियम आता बघूया. Survival of The Fittest. एक अतिशय साधा नियम. काय अर्थ होतो याचा? Fittest नेमकं कोणाला म्हणायचे? जो स्वतःमध्ये कालानुरूप बदल घडवतो तो विश्व-नियमांच्या दृष्टीने Fittest. जो बदलत नाही तो unfit. ज्या प्राण्यांनी स्वतःमध्ये बदल घडवले ते आजही टिकून आहेत, जे नाही बदलले ते लुप्त झाले. आपल्याला अपयश येते आहे म्हणजे आपण बदलायला तयार नाही हा त्याचा सरळसाधा अर्थ आहे. समाजात यशस्वी असलेल्या लोकांनी गरजेनुसार आपल्या सवयी, कामाची पद्धत, कामाची वेळ, आपले ज्ञान, आपली technique काही ना काही बदललेले आहे म्हणूनच ते यशस्वी झाले. यशस्वी व्हायचे असेल तर आपल्यालाही बदलायला शिकायला हवे. आपण बदललो तर परिस्थिती बदलते आणि यशाचे मार्ग मोकळे होतात. बदललो नाही तर आपण unfit होत जातो अन अयशस्वी होतो. दुसरा नियम ज्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत तो म्हणजे हि संपूर्ण सृष्टी आपलीच आहे, आपल्याचसाठी आहे आणि आपणच तिला घडवत असतो. शाहरुख म्हणतो त्याप्रमाणे “पुरी कायनात” सुद्धा आपल्या मदतीसाठी धडपडत असते पण आपणच घोळ घालतो.  ती “कायनात” ज्या लोकांच्या निमित्ताने आपल्या सानिध्यात आलेली असते, त्यांनाच आपण दूर लोटत राहतो. आपल्याच लोकांशी शत्रुत्वाने वागू लागतो, त्यांचा द्वेष करतो, राग धरतो आणि मदतीसाठी म्हणून पाठवलेले आपलेच मित्र, नातेवाईक, आपला जोडीदार आणि आपली मुलं यांना वेठीला धरतो. त्यांच्या चुकांवर बोट ठेवून पुन्हा पुन्हा त्यांना शिक्षा करायचे प्रयत्न करत राहतो. कसे यशस्वी होणार आपण? समोर आलेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक घटना आपल्याचसाठी निर्मिलेली असते. आपण त्या वस्तूचा, व्यक्तीचा वा घटनेचा स्वीकार तर करत नाहीच प्रसंगी अव्हेर करतो.

                   आपल्या ईच्छाहि काय असतात ?  निकोप नातं, निरोगी आयुष्य, एखादी चांगली नौकरी आणि पुरतील एवढे पैसे. थोडक्यात सुखी आणि आनंदी होऊन जगावं अशीच आपली ईच्छा असते. परंतु ती फक्त ईच्छाच असते. आपली वागणूक मात्र याच्या अगदी विरुद्ध असते. आपण सतत अपयशाच्या भीतीने चिंताग्रस्त असतो. आपल्याच क्षमतेवर किंवा आपल्याच लोकांवर सतत अविश्वास दाखवत असतो.  आपली वर्तणूक हि पूर्णतः आपला आपल्याशी होत असलेला संवाद (स्वसंवाद) कसा आहे यावर अवलंबून असते. हा स्व-संवाद म्हणजे आपण निर्माण केलेली आपल्या आयुष्याची कल्पना असते. आणि जिथे ईच्छा आणि कल्पना यांचा द्वंद होतो, तिथे फक्त आणि फक्त कल्पनाच जिंकणार हा या विश्वाचा नियम आहे जो आपण दुर्लक्षिला आहे. हि कल्पना म्हणजे आपलं आयुष्य आपल्याला कसं हवं आहे याचं visualization असत. Rhonda Byrne च पुस्तक, The Secret तुम्ही वाचलं असेलच, आपण रोज जशी कल्पना कल्पना करतो, तसचं आणि तेच आपल्या आयुष्यात घडणार हे ठरलेलं आहे. फक्त ईच्छा असून चालत नाही. विचारसुद्धा त्याच दिशेने कार्यान्वित करावे लागतात आणि तिथेच स्व-संवाद येतो. आपला स्व-संवाद म्हणजे विश्व-नियमांच्या अधीन राहून श्रुष्टीला दिलेला आपला आदेश असतो. या आदेशात जर अपयशाची भीती डोकावत असेल तर अपयश येणारच कारण “कायनात” आपल्या आदेशाचं तत्परतेने पालन करत असते. “आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार” असं जे म्हणतात त्यामागे हेच कारण आहे. आपल्याला घडवणे वा बिघडवणे, आपले यश वा अपयश, आपले सुख-दुःख सर्व काही या स्व-संवादावरच अवलंबून असते.  आपल्या आयुष्याचे संपूर्ण यश हे आपला स्वतःशी असलेला संवाद कसा आहे यावरच सर्वस्वी अवलंबून असतो. हे जर आपण समजून घेतले तर कृत्रिम पायाने अनुरीमा Everest कशी चढू शकली हे सहज  लक्षात येईल. कसा सुरु असतो असतो हा स्व-संवाद? इतका प्रभावी का असतो तो? आणि हे सर्व नेमकं कसं घडतं? जर स्व-संवाद इतका महत्वाचा आहे तर तो improve कसा करायचा. हे सर्व आपण पुढच्या post मध्ये पाहणार आहोत…  तूर्तास, इथे थांबूया, तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना हि post जरूर share करा कारण प्रत्येकाला स्वतःचा शोध घ्यायचा आहे आणि या शोधात तुम्ही त्यांची मदत करू शकता …शेवटी, ज्यांच्यासोबत आपण share करत असतो त्यांची आपण care करत असतो, खरं आहे ना?..

वि रा…!

2 thoughts on “यशस्वी भव !

  • December 16, 2016 at 7:12 pm
    Permalink

    Inspirational article. Keep writing.👍

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: