Reaction via Response.. संवादाकडे प्रवास !

घरातलं Facebook काय म्हणतंय? या माझ्या पोस्टला ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यांचा सूर प्रामुख्याने Reactions moderate करायच्या म्हणजे नेमकं काय करायचं असा होता. काहींनी तसं का करायचं? आपण जसे आहोत तसे जगाला दिसलो तर कोणाला problem का असावा? असा हि सूर आळवला. तर काही निवडक मित्रांनी  “थोडक्यात आवरतं घेतलंस, सविस्तर लिही”, असा धमकीवजा आदेशच देऊन टाकला म्हणून आजचा हा लेखन-प्रपंच !

                         Reaction moderate का करायची हे सांगणं आता फार आवश्यक आहे असं मला वाटतंय. असं समजा कि तुम्ही ऑफिस मधून घरी आले आणि फ्रेश होऊन सोफ्यावर पेपर चाळत बसले. सौ नं चहाचा कप हातात देत विचारलं,”चलता का बाहेर? थोडा फेरफटका मारून येऊ.” आणि तुम्ही उत्तर दिलंत,”नको आता, मी पुरता थकलो आहे. तू ये ना जाऊन, मी बसतो थोडावेळ.” सौ तयारी करण्यासाठी आत गेली आणि बरं झालं सुटलो असा विचार मनाशी करत तुम्ही पेपर मध्ये डोकं घालता नं घालता तोच एक प्रश्न तुमच्या कानावर येऊन आदळतो, “मी कशी दिसते?” हा प्रश्न ऐकताक्षणी पेपरच्या पानावर तुम्हाला दिसलेली बायकोची आकृती म्हणजेच Reaction. एकदsssम original, “तुमच्या दृष्टीने” अगदी योग्य. पण तरीही सौ तुम्हाला कशी दिसली ते तुम्ही  सांगणार का?  नाही, कारण इथे तुमची सद्-सद्विवेकबुद्धी  कामाला लागते, “बाबा रे, अजून रात्रीचं जेवण भेटायचं आहे.” मग पेपर मधून मान वर काढत  “काssssय दिसतेस तूssss?” असा जो प्रतिप्रश्न तुम्ही करता तो प्रश्न म्हणजेच moderated reaction (Response). तुम्ही कितीही चांगलं उत्तर द्या. सौ. चं खरं समाधान होणार नसतं. पण तुमची मात्र मोठ्या संकटातून सुटका होते. अपवाद वगळता फारच थोडी मंडळी असतील जी या प्रश्नाचे उत्तर कसलीही जीवित अथवा वित्तहानी न होऊ देता “जस वाटलं तसं देऊ शकत असतील.” इतरांना आपल्या भावना आवरत्या घ्याव्याच लागणार आणि reaction moderate कराव्याच लागणार हे विधिलिखित आहे.

                          यातला मजेशीर भाग जर सोडला तर Reactions अशा असतात,  spontaneous. आणि त्यांच्या घडण्यात आपल्याला बालपणापासून आलेले व्यक्तीचे, वृत्तीचे अथवा प्रसंगांचे अनुभव, त्या अनुभवांच्या कटू-गोड आठवणी आणि त्या अनुभवांमधून बोध घेण्याची आपली वृत्ती यांचंच योगदान जास्त असतं. ह्या सर्वांनि मिळून आपली एक Belief system तयार होत असते. ज्याचा परिणाम म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीत कसं वागायचं हे आपण आधीच ठरवून घेतो आणि आधीच माहित (ज्ञात) असलेल्या अशा गोष्टींवरून समोर असलेल्या प्रसंगावर वा व्यक्तीवर आपण React होत असतो. सद्द्य-परिस्थितीचा विचार त्यात कमीच असतो. केवळ आपल्याला “वाटलं” म्हणून आपण तसे वागतो म्हणजे त्यात वास्तविकता सुद्धा मर्यादितच असते. येणारा प्रत्येक अनुभव हा नवा असू शकतो हा विवेक मागे पडतो आणि फक्त भावनांचे प्रदर्शन पार पडते. परिणाम मात्र भयंकर असतो. घरा-घरांतून ताणल्या गेलेल्या नाते-संबंधांचा जर विचार केला तर हि बाब किती चिंताजनक आहे याची प्रचिती येते. संवाद कमी होतो आहे नि वाद वाढतो आहे त्याला कारण फक्त एकच, दिवसागणिक आपण responsive कमी आणि Reactive जास्त होतो आहोत.

                       खरंतर सजीवांना बदलणाऱ्या परिस्थितीचे आकलन होण्यासाठी तयार केली गेलेली हि निसर्गाची रचना. सभोवतालची परिस्थिती अनुकूल आहे कि प्रतिकूल आहे हे समजण्यासाठी आपल्याला इंद्रियांमार्फत संवेदना होतात. त्या संवेदनावरून परिस्थिती उपकारक आहे कि अपायकारक याची जाणीव निर्माण होत असते. हि जाणीव म्हणजेच भावनांचं उगम-स्थान. सजीवांना त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि वंश चालवण्यासाठी हे आवश्यक होतं. कोणतीही भावना असो, तिच्या मुळाशी एकतर सुखदायक नाही किंवा दुःखदायक जाणीव (Feeling) असते. Happy Feelings असतील तर वादच नाही. प्रेम, आपुलकी, आनंद, सहानुभूती ई. भावना व्यक्त करून माणसं जोडत आपण आनंदात आयुष्य घालवतो. दुर्दैवाने चित्र फारसं चांगलं नाहीये. प्रोफेशनल फ्रंटवर जरी बहुतांश लोकं यशस्वी होताना दिसत असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र कोलाहल आहे. कारण एकच आहे, व्यक्त होणं चुकत आहे. घर असो वा ऑफिस, आपल्या वागण्यात rationality कमी आणि emotional drama तुलनेने जास्त आहे. मागच्या पोस्ट मध्ये मी जे वडील-मुलांचं उदाहरण दिलेलं होतं त्यातले वडील qualified होते. मुलांच्या शिक्षणाकडेही त्यांचं बारीक लक्ष होतं. त्यांची तिन्ही मुलं आज well-settled आहेत. पण दुर्दैवाने मुलांचं आणि वडिलांचं संभाषण जवळ-जवळ बंद आहे. सतत मुलांचं कसं होईल या चिंतेत असलेल्या वडिलांनी त्यांचं बालपणच त्यांच्यापासून हिरावून घेतलं होतं. हे कर, ते नको करू, इथे बस, तिथून उठ, खेळू नको, अभ्यास कर, अमक्यासोबत बोलू नको, तमक्याच्या घरी जाऊ नको, रात्री जागरण नको, सकाळी लवकर उठ असे दिवसभरात कमीत कमी १०० उपदेश. कारण काय तर मुलं चुकली नाही पाहिजे. हे अनाठायी आहे. बऱ्याच पालकांची चिंता करण्याची पद्धत अशीच असते. एका मर्यादेपर्यंत आवश्यक मात्र तिथून पुढे अनावश्यक. आता हि मर्यादा ओळखायची कशी? मला एक सांगा, वासरू जर पळता पळता पडलं तर गाय त्याला रागावते किंवा मारते का हो? किंवा मांजरीची पिल्लं घ्या. खूप मस्ती करत असतात, उड्या मारतात, इकडून तिकडे पळत असतात, मांजर झोपली असेल तरी तिचा चावाही घेतात. मी कोणत्याच मांजरीला पिल्लांच्या पाठीत धपाटा घातलेलं नाही पाहिलं. का? त्यांना भावना नसतात? त्या तर प्रत्येक प्राण्यांकडे आहेत. मग आपणच मुलांना का मारतो? मुलगा पडल्यावर आपण त्याला उठवतो न उठवतो तोच त्याच्या पाठीत धपाटा घालतो अन काय म्हणतो? कितीदा सांगितले तुला अशी मस्ती नको करत जाऊ. हे कितीदा कोण सांगतंय? तर “मी”सांगतोय. त्याच्या पाठीत धपाटा घालतांना तो पडल्याच्या दुःखापेक्षा “मी कितीदा सांगितलं” तरी तू ऐकत नाहीस याचाच राग जास्त असतो. हा “मी” हल्ली खूप मोठा झाला आहे. मुलांसमोर व्यक्त होताना आपण पालक म्हणून आपलं श्रेष्ठत्व टिकवून ठेवण्याचा अट्टाहास करतो. मला जास्त कळत म्हणून तू माझंच ऐक, आपलं डोकं चालवू नकोस ही आपली भूमिका असते आणि हळू हळू दरी पडायला सुरु होते. साहजिकच मुलं ऐकत नसतात. त्यांची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नसते मग जस-जशी मुलं मोठी होऊ लागतात, मतभेद वाढतात. त्याला आपण Generation Gap असं गोंडस नाव देतो अन आपला खाक्या सुरूच ठेवतो. “चुकतील तर शिकतील” हे प्राण्यांना कळतं मग आपल्याला का नाही कळत? तितकं थांबायची, त्यांना स्वतःच चुकून शिकू द्यायची आपली तयारी नसते. आपण Emotionally react करतो, त्याच्या प्रत्येक कृतीवर आक्षेप घेतो आणि संवाद कमी कमी होतं जातो.

step-by-step-how-to-free-yourself-from-negative-emotions-1
संवादाअभावी प्रत्येक जण एकटा इथे !

                     पती-पत्नीच्या नात्याची पण गत काही निराळी नाहीय. संवादाअभावी कित्येक जोडपी आज एका छताखाली राहत असूनही दोन भिन्न आयुष्य जगत असतात. आणि संवाद का नाही? कारण तितका संयम आपल्याकडे नसतो. लगेच निष्कर्षावर येण्याची घाई आपल्याला नाण्याची दुसरी बाजू पाहूच देत नसते. सोबत राहत असतांना वाद-विवाद होणं अथवा मतभेद असणं स्वाभाविक आहे. विवाद उद्भवले असता आपल्या मनात येणाऱ्या भावना आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला काय वाटत आहे, त्यामागे आपली कोणती सुप्त इच्छा दडलेली आहे (भावनिक गरज) आणि ती पूर्ण कशी होईल हे शब्दात मांडता आले पाहिजे. समजा तुमच्या जोडीदाराने दिलेला शब्द पाळला नाही आणि तुम्हाला त्याचे वाईट वाटले. तुमची स्वाभाविक प्रतिक्रिया काय असते? तुम्ही चीड-चीड करता, रागावता फारच गंभीर परिस्थितीत १-२ दिवस संभाषण बंद करता. त्याने काय होते? परिस्थिती आणखीनच चिघळते. त्याचे परिणाम घरातल्या इतर कामांवर होतात. जर शब्द न पाळण्यामागे जोडीदाराची खरंच काही अडचण जर असेल तर मग तोही तुमच्या अशा वागण्याने व्यथित होतो कारण तुम्ही त्याची अडचण समजूनच घेत नाही असं त्याला मनोमन वाटून जातं. खरं काय घडलेलं असतं? दिलेला शब्द न पाळून जोडीदाराने तुमचा अनादर केला आहे आणि तुम्हाला “गृहीत धरलेलं आहे” असं वाटून तुम्ही दुखी होता. तुम्हाला येणाऱ्या “राग” या भावनेखाली त्याने तुम्हाला अपेक्षित असलेला आदर तुम्हाला द्यावा ही तुमची सुप्त इच्छा असते जी त्याच्याकडून पूर्ण न होऊ शकल्यामुळे तुम्ही चवताळून उठता. ही सुप्त इच्छा तुम्हाला ओळखता आली आणि योग्य शब्दात जर जोडीदारापर्यंत पोहोचवता आली तर कित्येक वाद मिटतील. कारण  जिथे संवाद वाढतो तिथे उपाय शोधण्याची प्रक्रिया सुरु होते. यासाठी पाहिजे असतो तो थोडा संयम आणि स्वतःची पुरती ओळख.

                         लहानपणी वाचलेली एक गोष्ट आजही आठवते. पाणी आणायला गेलेली एक स्त्री आपल्या तान्हुल्याजवळ मुंगूस सोडून जाते. ती जेंव्हा परत येते तेंव्हा तिला दिसते कि मुंगूस दारात बसलेला आहे आणि त्याच्या तोंडाला रक्त लागलेले आहे. मुंगुसाने आपल्याच बाळाला मारले असा विचार (अविचार) करून ती घागर मुंगुसावर आदळते, मुंगूस तिथेच गतप्राण होतो. ती जेंव्हा आत जाऊन पाहते तर तिचं बाळ खेळत असतं, शेजारी एक मेलेला साप असतो जो मुंगसाने मारलेला असतो आणि आता मालकीण खुश होऊन आपल्याला शाबासकी देईल या आशेने दारात येऊन मुंगूस तिची वाट बघत असतो. पण त्याच्या नशिबी काय येते? त्याचप्रमाणे जेंव्हा आपण पुरेसा विचार न करता React करतो, हेच घडतं. मनावर कायमचे ओरखडे पडतात, कित्येक नाती हळू हळू गतप्राण होतात… तेंव्हा React करण्याआधी थोडा वेळ घेत चला ! राग आल्यावर counting करण्याची अथवा 1 दिवस तरी तो विषय टाळण्याची जी सूचना केली जाते ती यासाठीच. आपण स्वतः ला प्रश्न विचारून, परिस्थितीचे आकलन करून घेऊन केवळ भावनेच्या भरात एखादी कृती न करता सद्सद्विवेकबुद्धीने वागावे हेच अपेक्षित आहे. काय म्हणता? कराल नं आपल्या reactions ला response मध्ये convert? करून तर बघा आणि मला सांगा तुमचं आयुष्य त्यामुळे कसं बदललंय …

                       तुमचं मत कळवा. पोस्ट आवडल्यास मित्रांना जरूर share करा आणि जास्तीत जास्त लोकांना स्वतःच्या या शोधात सामील करून घ्या.

 विरा.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: