मी.. मला.. माझे

मी कोण ?

समुद्र किनारा, गार गार वारा.
ईवल्याशा ओंजळीत…. आसमंत सारा !

निसर्ग, झाडं, पशु-पक्षी, नदी नाले, डोंगर-दऱ्या आणि या सर्वांमध्ये रमणारा……….. मनुष्याचे मन, त्याचे विविध पैलू अन त्यातून रसरसून तयार झालेले आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न करणारा

आयुष्य म्हणजे एक वर्तुळ असतं. जिथून सुरु होतं तिथेच येउन थांबणारं… सुरुवात आणि शेवट या दरम्यान जे आयुष्य…., त्याला प्रत्येक जण आपापल्या परीने समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अश्या प्रत्येक प्रयत्नाला मनापासून दाद देणारा….

 

मला काय आवडतं?

आपलं मन कसं काम करतं, आपल्या सवयी कशा बनतात, यशस्वी होण्यासाठी आपण स्वतःमध्ये कोणते आणि कसे बदल करावेत याचा आढावा घ्यायला आवडतो… पुस्तकांसोबत माणसेही वाचायला आवडतात. त्या वाचनातूनच सुरु झालेला हा स्वतःचा शोध…. कधी तरी संपेल या आशेवर !

 

माझे स्वप्न?

एक व्यक्ती म्हणून जगत असतांना व्यक्तिगत स्तरावर तसेच व्यावसायिक स्तरावर आपल्याला यशस्वी व्हायचे असते. विरोध मात्र भरपूर असतो, कधी बाह्य जगाचा तर कधी आपलाच स्वभाव आणि काही सवयी आपल्याला नडतात. यासर्व गोष्टीतून पार होणे असल्यास फक्त प्रयत्न करून भागत नाही तर स्वतःची ओळख होणेही गरजेचे असते. तुम्हाला स्वतःची  ओळख करून देणे हेच वलयांकितचे स्वप्न….

 

चला तर मग, वाचा आणि मित्रांमध्ये जरूर share  करा ….!

तुम्ही पण माझ्या या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा. आपले मनोगत नियमितपणे कळवत राहा. लेख email द्वारे प्राप्त करण्यासाठी आपल्या ई-मेलची नोंद वलयांकितवर करा

 sunrise   वि. रा….!

%d bloggers like this: