होळी

होलिकोत्सव म्हणजे आपली आवडती होळी.

वैयक्तिक हेवेदावे, मनमुटाव आणि नाराजी दूर करुन नाते संबंध सुधारण्यासाठी आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेली एक अनोखी भेट म्हणजे आपली होळी.

होळी पेटवून त्या धगधगत्या आगीत अनुभवलेले सर्व वाईट क्षण, नात्यांमधील कटुता, आपले दुर्गुण, वाईट सवयी आपण अर्पण करतो.

बहुतेक सर्व जण पेटत्या होळी समोर आपल्या मनातील सल बाहेर काढतात. ज्याच्या विषयी मनात राग आहे, त्याच्या नावाने बोंब मारतात. दाबून ठेवलेल्या रागाला वाट मोकळी करून देतात.

समोरचा पण त्याच पद्धतीने आपली भडास काढतो. खटकलेल्या गोष्टी आठवून मनातला राग व्यक्त करतो.

दोघेही शिव्या देतच एकमेकांना मीठी मारतात. मनातली सर्व सल होळीमधे जळून जाते.

जितक्या सहजपणे होळीच्या दिवशी हे स्विकारले जाते तितक्याच सहजतेने ते ईतर दिवशी स्विकारता आले तर?

कित्येक नाती तुटण्याआधी सावरतील,

कित्येक संबंध शेवटचा श्वास मोजण्याआधी सुधारतील…

आपल्यावर होणारी टीका ईतर दिवशी आपल्याला सहन का नसेल होत?

अहंकार आडवा येत असेल का?

कळवा बघु तुमचे मत…

वि. रा. !!!

 

विरा

वाचन, चिंतन आणि मनन. थोड्या गप्पा - थोडी मस्ती. त्यातून वेळ मिळालाच तर आयुष्य कशाला म्हणायचे? चांगले आयुष्य जगायचे म्हणजे काय करायचे? आपल्या आवडी निवडी जपत कसे जगता येऊ शकते? या व इतर बाष्कळ प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवायचा.. आपल्याला पडलेली प्रश्न आणि त्यांची सापडलेली उत्तरे त्याशिवाय काही खुली तर काही अवघडलेली स्वप्नं हे सर्व ब्लॉग वर टाकत राहायचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: