शब्दांच्या पलीकडे…

शब्दांना मंत्राचे सामर्थ्य असते. आपण उच्चारलेला प्रत्येक शब्द आपल्यासाठी विश्वाची रचना करण्यात गुंतलेला असतो. म्हणूनच बोलत असतांना सकारात्मक विचार आणि विधायक वाणी असणे आवश्यक असते.

वलयांकित “शब्दांच्या पलीकडले” या सदरातून सकारात्मक आणि विचार करायला भाग पडणारे सुविचार घेऊन रोज तुमच्या भेटीला येत जाईल.

तेंव्हा आपला ई-मेल वलयांकितवर नोंदवा आणि मिळवा रोज एक सुविचार जो तुमच्या जगण्याला पाठबळ देईल

मित्रांनो, आपल्या विचारांचा आपल्या अदृश्य मनावर पगडा असतो. अदृश्य मन हे आपले सेवक असते. आपण जागेपणी कल्पिलेली प्रत्येक गोष्ट वास्तवात आणण्याची ताकद आपल्या अदृश्य मनात असते. हे ते मन आहे जे विश्व-नियमांनी बनलेले असते आणि त्याच्यासाठी अशक्य असे काहीच नसते. तुम्ही जर माझा लेख ………. वाचला असेल तर ह्या मनाविषयी तुम्हाला पुसटशी कल्पना येईल.

तुम्हाला हव्या असलेल्या आयुष्याची कल्पना तुम्ही तुमच्या अदृश्य मनाला द्या आणि तेच आयुष्य समोर येत असल्याचा अनुभव घ्या… अट मात्र एकच… स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात आयुष्य घडविण्याचे सामर्थ्य आहे, एका समृद्ध आणि संपन्न जीवनावर तुमचा हक्क आहे. ते आयुष्य पुन्हा-पुन्हा समोर येतसुद्धा असते. परंतु स्वतःवर सतत अविश्वास दाखवल्याने, ते आयुष्य पुन्हा बाजूला होऊन जाते. उरते ते फक्त एक चिंतेने पोखरलेले, सतत अडचणींचा सामना करणारे आयुष्य…. याचीच तर कल्पना आपण करत नव्हतात ना?

मी येथे काही शब्दांचा समुच्चय देत आहे.. ज्यावेळी आपण त्या शब्दांवर विश्वास ठेवून त्यांचा पुनरुच्चार करू लागतो, त्यावेळेपासून त्या शब्दांना प्रार्थेनेचे आणि मंत्राचे सामर्थ्य प्राप्त होते… तेंव्हा प्रत्येक शब्द मनापासून उच्चारा, रात्री झोपतांना आणि जेंव्हा जेंव्हा उसंत मिळेल तेंव्हा सुंदर आयुष्याची कल्पना करत हि प्रार्थना म्हणा… तुम्हाला स्व-सामर्थ्याचा प्रत्यय येऊ लागेल…. तुमचे आयुष्य घडविण्याचे सामर्थ्य तुमच्यातच असते.. तुम्हाला फक्त तुमच्या सामर्थ्याला कार्य सुरु करण्याचे आवाहन करायचे असते. ते आवाहन कसे करायचे ते येथे दिलेले आहे…

 

Daily prayer

 

 

विरा !!!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

%d bloggers like this: