वेध भविष्याचा

2 दिवसांपूर्वी linkedin वर एक पोस्ट वाचली, पोस्ट टाकणारा एका B.P.O. कंपनी मधे काम करत होता. पगारही चांगला होता. 2 महिन्यांपुर्वी कंपनीने त्याला कामावरून कमी केले. तेंव्हापासून तो दुसरा जाँब शोधतो आहे. आपल्या लींकमधे असलेल्या सर्व लोकांना त्याने कुठे काम असेल तर सुचवावे अशी कळकळीची विनंती केली आहे. परिस्थिती खरच गंभीर आहे.
दुसरा एक प्रसंग, माझा एक मित्र गेल्या 4 वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे, अपेक्षित यश काही मिळाले नाही आणि आता त्याचे मनोधैर्य खचत चालले आहे. खुप झाली तयारी, घरच्या परिस्थिती चा विचार कर आणि प्रायव्हेट जाँब नकोच असेल तर स्वतः चा काही धंदा सुरू कर असे चर्चा करताना त्याला मी सुचविले. त्यावर तो गोंधळून म्हणाला, “यार, जाँब नाही करायचा तर करायचे तरी काय?”.
नौकरी मिळत नाही ही खरंतर जूनी समस्या. त्या समस्येने ऊग्र रूप धारण तर केलेच आहे परंतु त्या ही पुढे जाऊन आता अशी परिस्थिती आहे की मिळालेली नौकरी टिकवून धरणे अजून जास्त अवघड झाले आहे. नौकऱ्यांमधील अस्थिरता कधी नव्हे ईतकी वाढली आहे.
परंतु, आसपास घडत असलेल्या ह्या घडामोडींकडे आपण साफ दुर्लक्ष करत आहोत. आजही नौकरीच्या मानसिकतेमधून बाहेर पडून आणखी काही करण्याचा विचार आपण करू शकत नाही आहे हे दुर्दैवी आहे.

नौकरकपात धोरण कशामुळे?

जर आपण जगभरातील कंपन्यांचा ऊत्पादनाचा ट्रेंड पाहिला तर हे लक्षात येते की ऊत्पादन क्षमता घटतच आहे. परिणामी, नफा घटतो आहे. आणि तो वाढवण्याच्या ऊपायांपैकी एक ऊपाय म्हणजे खर्च कमी करणे. मग, नौकरकपात ओघाने आली. हे तर झाले पारंपारिक कारण. यात आता जगभर सुरू असलेल्या कृत्रीम बुद्धीमत्तेच्या (Artificial Intelligence) क्षेत्रातील संशोधनाची भर पडली आहे. आणि हे संशोधन ज्या गतीने पुढे जाते आहे, त्या गतीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या भीषण असणार आहेत. त्या साठी गरजेचे आहे ते भविष्याचा वेध घेणे आणि त्या अनुषंगाने आपले शिक्षण आणि त्या सोबतच आपला करियरकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलणे. आणि येथेच घोळ होतो आहे हे वर दिलेल्या दोन्ही ऊदाहरणांवरुण स्पष्ट होत आहे.
कृत्रीम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात सध्या काय सुरू आहे यावर तुम्ही कधी नजर टाकली आहे? खाली दिलेला हा व्हिडीओ बघा.. हुबेहूब आपल्या सारखे दिसणारे आणि माणसासोबत काम करणारे १० रोबोट्स येथे दाखवलेले आहेत.

काही लक्षात घेण्यासाठी महत्त्वाचे
१. कृत्रीम बुद्धीमत्तेच्या (Artificial Intelligence) संशोधकांनी असे रोबोट्स तयार केले आहेत जे मनुष्यासारखाच विचार करून काम करु शकतात.
२. म्हणजे हे रोबोट्स केवळ सांगितले तेवढेच काम करणारे रोबोट्स नसून, समोर आलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन, त्यावर विचार करून त्या प्रमाणे प्रतिसाद देणारे आणि काम पुर्ण करणारे रोबोट्स आहेत.
३. अशी सर्व कामे जिथे पुन्हा पुन्हा तेच काम करावे लागते, तिथे हळूहळू रोबोट्सची वर्णी लागणे सुरू झालेले आहे.

 

परिणाम काय आहेत?

१. HDFC बँकेने नेमलेली ईव्हा, गुगलने नेमलेली सिरी आणि कित्येक ठिकाणी असलेली IVR मशीन्स हे रोबोट्स आहेत

२. कामातील अचूकता, ऊत्पादनक्षमता आणि दुरगामी खर्चाचा विचार करता कंपन्यांना रोबोट्स हे जास्त परवडतात

३. वाढत्या लोकसंख्येच्या वाढणाऱ्या गरजा पुरवण्यासाठी ज्या गतीने ऊत्पादन हवे आहे, ती गती मिळवण्यासाठी रोबोट्स शिवाय पर्याय नाही, हे कंपन्यांच्या लक्षात येऊ लागले आहे

४. जसजसे संशोधन प्रगत होईल आणि रोबोट्सच्या किमती कमी होतील, सर्वच ठिकाणी रोबोट्सचा ऊपयोग सुरू होईल. येत्या ७-८ वर्षात हे शक्य होणार आहे.

५. यामुळे, भविष्यात नौकरकपात आणखी वाढणार यात तिळमात्रही शंका नाही.

सर्वात आधी नौकरकपात कुठे?

१. औद्योगिक ऊत्पादनाची सर्व क्षेत्रे जिथे आँटोमेशन होऊ शकते, जसे टु व्हिलर आणि फोर व्हिलर बनवणाऱ्या कंपन्या, फार्मा कंपन्या आणि सर्वच मँन्युफँक्चरिंग क्षेत्र

२. अहमदाबाद जवळ विठ्ठलपुर येथे होंडा कंपनीने प्लांट ऊभा केला आहे. जिथे ७० कामगार ३ शिफ्ट मधे काम करत होते तेवढेच काम आज ५ रोबोट्स करत आहेत, तेही ऊत्पादनातील सर्व चुका टाळून हे विशेष.

३. बँकिंग, ईन्शुरन्स, ईन्वेस्टमेंट, बीपीओ आणि डाटा हँडलिँगशी निगडित सर्वच कंपन्या रोबोट्स वापरु लागल्या आहेत.

४.  स्टेट बँक ऑफ इंडियासंबंधी money control.com वर ऊपलब्ध बातमी येथे वाचा

http://www.moneycontrol.com/news/business/companies/sbi-reduces-employee-base-by-10500-from-apr-sep-5000-more-to-retire-by-march-2438005.html

त्या बातमीमधे हे स्पष्ट दिलेले आहे की रोबोट्स च्या क्षेत्रातील विकासामुळे मनुष्यबळाची गरज हळूहळू कमी होत जाणार.

५. स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक असुनही सरकारी नौकऱ्या निर्माण करण्याऐवजी नौकरकपातीचे धोरण अवलंबवुन ती बँक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्न करते आहे यावरून पुढे येणाऱ्या परिस्थितीचा अंदाज सहज लावता येतो.

६. सद्यस्थितीत कंपन्यांच्याच्या वतीने सुरू असलेल्या नौकरकपातीचे सुक्ष्म अवलोकन करुन परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे म्हणूनच आवश्यक झाले आहे.

 

४ थी औद्योगिक क्रांती आणि तिचे परिणाम:-

आपणास हे माहितीच आहे की आजपर्यंत ३ वेळा औद्योगिक क्रांती झाली आहे. आता येणारी क्रांती ही ४ थी क्रांती असेल. ही औद्योगिक क्रांती फार वेगळी आहे. आतापर्यंत जितकही मशिनरींचे शोध लागले, प्रत्येक वेळी ती मशिनरी चालवण्यासाठी मनुष्याची गरज पडत होती आणि त्यातुन रोजगार निर्मिती होत गेली. आता येणारी क्रांती म्हणूनच वेगळी ठरते जिचे पाळंमुळं हे ३ ऱ्या औद्योगिक क्रांती मधे दडलेली आहेत. त्या क्रांतीमधून ऊदयास आलेले ईंटरनेट हे ४ थ्या क्रांतीचा मूळ आधार असुन त्यातून ईंटरनेट आँफ थिंग हे तंत्रज्ञान ऊदयास आले आहे.
ईंटरनेट आँफ थिंग हे असे एक तंत्रज्ञान आहे ज्या योगे सर्व मशिनरी ही एकमेकांशी आणि पर्यायाने आपल्या मोबाईल तसेच लँपटाँपसोबत जोडलेली असेल. म्हणजे आता प्रत्येक मशिनरी साठी आँपरेटर्स लागणार नाही. ती मशिनरीच एकमेकांना आँपरेट करतील.

मग मनुष्यबळाचे काय होणार? ईतके सर्व लोकं काय काम करतील? परिणाम खरंच गंभीर आहेत, जगभर नौकरकपात आणखी वेगाने होणार. ही क्रांती सुरू झालेली आहे. औरंगाबाद सारख्या छोट्याशा शहरात आजघडीला सुमारे ५०० रोबोट्स वेगवेगळ्या कारखान्यात कामाला जुंपलेले आहेत… ह्यात वर्षागणिक वाढच होणार हे निश्चित आहे.

आपले भविष्य सुरक्षित कसे राहिल?

भविष्य सुरक्षित करणे म्हणजे कमाई अखंडित राहील याची व्यवस्था करणे. नौकरकपातीचा सर्वात जास्त फटका त्यांना बसतो ज्यांचा ईन्कम सोर्स एकच असतो आणि तो म्हणजे नौकरी. जसे मोठमोठे बिजनेसमनसुद्धा आपले ईन्कम वाढवण्यासाठी डायव्हर्सीफाय करतात त्या प्रमाणे आपणसुद्धा आपले ऊत्पन्नाचे सोर्सेस वाढवणे गरजेचे आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाकडे काही ऊपजत कलागुण असतात. काही आवड किंवा छंद असतात. तोच धागा पकडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. कारण, जाँब मधेे आपण रोबोट्सला हरवू शकणार नाही आहोत. आणि म्हणूनच आता फक्त जाँबचा विचार करून भागणार नाही तर करिअर करणे ही काळाची गरज आहे.

जाँब आणि करिअर या दोहोंमधला फरक जाणून घ्यायचा असल्यास माझा हा लेख तुम्ही नक्कीच वाचायला हवा.

आज तंत्रज्ञान ईतके प्रगत झाले आहे की कोणत्याही विषयावर सर्व माहिती क्षणात ऊपलब्ध होते. आपल्या आवडत्या क्षेत्रात वेळेची हळूहळू गुंतवणूक करुन आपण नवीन काय करु शकतो हे शोधून काढून त्या दिशेने विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.

हे सर्व करण्यासाठी वेळेची ऊपलब्धता किती असेल हा चिंतनाचा भाग नक्कीच आहे. परंतु, त्यासाठी मार्ग काढणे हे आपल्याच हाती आहे. गरज आहे ती ईच्छाशक्तीची आणि वेळेचे नियोजन करण्याची. आपला जाँब सुरू ठेवून सोबतच आणखी काय करू शकतो आणि कसे करु शकतो याचे कोष्टक बनवून त्याचे काटेकोर पालन केले तर फार तर फार वर्षभरात दुसरे ईन्कम सुरू होऊ शकते.

छंदातून करिअर कसे घडवायचे या बाबत वलयांकितवर विशेष लेख प्रकाशित होत राहणार आहेत, तेंव्हा वलयांकितला सबस्क्राईब करा आणि तुमच्या छंदातून तुमचे करिअर घडवा. आपल्या मित्रांना हा शेअर करायला मात्र विसरु नका.

वि. रा. !!!

विरा

वाचन, चिंतन आणि मनन. थोड्या गप्पा - थोडी मस्ती. त्यातून वेळ मिळालाच तर आयुष्य कशाला म्हणायचे? चांगले आयुष्य जगायचे म्हणजे काय करायचे? आपल्या आवडी निवडी जपत कसे जगता येऊ शकते? या व इतर बाष्कळ प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवायचा.. आपल्याला पडलेली प्रश्न आणि त्यांची सापडलेली उत्तरे त्याशिवाय काही खुली तर काही अवघडलेली स्वप्नं हे सर्व ब्लॉग वर टाकत राहायचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: