पुस्तक मंथन

जितके जास्त वाचन, तितके समृद्ध जीवन

जग हे  दृष्टीकोनाधारित असते. जसा दृष्टीकोन तसे जग आपल्याला भासते. दृष्टिकोन बदलत राहतात. दृष्टीकोन जितका व्यापक तितके जगणे सोपे असे सरळ सरळ समीकरण असते. दृष्टिकोन व्यापक करायला मदत करणाऱ्या काही प्रमुख साधानांपैकीच एक म्हणजे पुस्तकं… पुस्तकांसारखा मित्र नाही.

आपल्याला येत असणारे अनुभव आणि त्यांचा आपण लावत असलेला अन्वयार्थ यातून दृष्टिकोन तयार होत जातो. हा अन्वयार्थ योग्य पद्धतीने लावता यावा म्हणून इतरांचे अनुभव आणि विचार जाणून घेणे अगत्याचे ठरते. आणि यासाठी आवश्यक असते वाचन. इतर लोकांनी पाहिलेले, अनुभवलेले आणि त्यांना भावलेले काही प्रसंग आणि त्यांचे अर्थ लेखक आपल्या पुस्तकातून मांडत असतो. हा आपल्यासाठी अमूल्य साठा असतो.

प्रत्येक पुस्तक वाचणे प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणून वलयांकित घेऊन येत आहे एक विशेष सदर “पुस्तक मंथन”.

मी वाचलेल्या पुस्तकांचे सारांश दर बुधवारी मी आपल्या या सदरातून देत राहील.

तेंव्हा आपल्या ई-मेल ची नोंद वलयांकितवर करा आणि प्रत्यक्ष पुस्तक ना वाचताहि पुस्तकातील आवश्यक ते ज्ञान/माहिती मिळवा. त्या माहितीचा उपयोग तुम्हाला आयुष्यात होणार हे सांगायला नकोच. अत्यावश्यक वाटलेच तर ते पुस्तक नंतर तुम्ही विकत घेऊन संग्रही ठेऊ शकता.

 

पुस्तकांची वर्गवारी साधारणपणे खालील प्रमाणे राहील

A) Personality Development 

B) Self Improvement

C) Biographies

D) Business / Entrepreneurship / Career 

E) Inspirational / Motivational

F) Mind / Brain informative

G) स्वभाव कसा बनतो, सवयी कश्या बनतात याविषयीची पुस्तके 

कृपया आपल्या ई-मेल ची नोंद वलयांकितवर आवर्जून करा.

विरा !!!

 

 

 

 

 

 

%d bloggers like this: