नाळ

मागील आठवड्यात नागराज मंजुळे यांचा “नाळ ” हा चित्रपट पहिला. तुम्ही पण नक्कीच पहिला असेल. चैत्या…. एक छोटा सा मुलगा, फार तर फार 7-८ वर्षाचा चिमुरडा. आपल्याच मस्तीत जगत रसरसून आयुष्याचा अनुभव घेत असतो.

त्याला जेंव्हा कळते कि ज्या स्त्रीला तो आई म्हणत असतो ती खरी आई नसून, त्याची खरी आई दुसरी आहे. तो आपल्या खऱ्या आईला पाहायला किती व्याकूळ होतो?

एक लहान मुलगा ज्याला आईचे सर्व प्रेम सुमन कडून मिळत असते त्याला खऱ्या आईचा विरह सहन न व्हावा? आईपणाची जाणीव किती खोलवर रुतलेली असते याचा पुन्हा प्रत्यय ह्या चित्रपटाने दिला.

अश्याच अजूनही काही गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या मनात खोलवर रुतून बसलेल्या आपल्याला आढळतात. आपल्या नाळचं जणू.

त्याला कारणेही तशीच आहेत. उत्क्रांतीच्या टप्प्यांमध्ये आपला मेंदू बरेच काही शिकला आणि त्या सर्व माहितीचा साठा आपल्या एकूण वर्तनामध्ये झळकत राहतो. आपली नाळ बनून जणू तो आपली सोबत करत राहतो.

नाळ प्रत्येकाची:

१. भीती: भीती खरं तर चांगली आहे. आदिम मानव जेंव्हा जंगलात राहत होता, तेंव्हा भीती हि त्याच्या जगण्याचा मुख्य आधार होती. जंगली श्वापदांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी भीती महत्वाची असायची. जो त्या काळी भीला, तोच जिवंत राहिला आणि त्याचेच  आपण सर्व वंशज आज जिवंत आहोत.

परंतु, त्याकाळी महत्वाची असणारी जीवाची भीती आज जवळजवळ नष्ट झालेली आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता आणि महानगरपालिकेने व्यवस्थित रस्ते बांधलेले असल्यास आज जीवानिशी जाण्याची शक्यता बऱ्याच अंशी नाहीशी झालेली आहे.

मात्र, भीती आपल्याला जी चिकटून बसलीय, ती काही केल्या जात नाही. ह्या जीवानिशी जाण्याच्या भीतीला आपण आपल्या करियर आणि ईगोशी जोडून घेऊन आजही अस्तित्वाची लढाई सुरूच ठेवलेली आहे.

हीच भीती पुढे अस्तित्वाची चिंता बनून, आपले मानसिक ताण-तणाव ईतके वाढवत आहे की, आपली नाळ बनून आपल्याच गळ्याभोवती घट्ट आवळली जात आहे.

हि नाळ तुटो आणि सर्व जण आनंदात जागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

विरा

वाचन, चिंतन आणि मनन. थोड्या गप्पा - थोडी मस्ती. त्यातून वेळ मिळालाच तर आयुष्य कशाला म्हणायचे? चांगले आयुष्य जगायचे म्हणजे काय करायचे? आपल्या आवडी निवडी जपत कसे जगता येऊ शकते? या व इतर बाष्कळ प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवायचा.. आपल्याला पडलेली प्रश्न आणि त्यांची सापडलेली उत्तरे त्याशिवाय काही खुली तर काही अवघडलेली स्वप्नं हे सर्व ब्लॉग वर टाकत राहायचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: