छंदांतून करियर कडे

तुमचं खरं करियर:

आपल्यापैकी बहुतेक लोकांना आपल्या छंदाबद्दल एक तर उशिरा जाणीव होते किंवा घरची परिस्थिती नसल्याने आपण शिकून लवकर नौकरी मिळवण्याच्या मागे लागतो. परिणाम तर आपल्याला माहितीच आहे. आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात नाही तर भलत्याच ठिकाणी अहोरात्र मेहनत घेत असतो. पैसे तर मिळतात पण समाधान काही मिळत नाही. एक अस्वस्थता कायम पाठलाग करीत राहते. आपली आवड अथवा छंद बाजूला राहते आणि आपण जॉब म्हणून दुसरे काही तरी करत असतो जे मनाला आनंद मात्र देऊ शकत नाही.

फेब्रुवारी २०१७ पासून वलयांकित एका विशेष ध्येयावर काम करणार आहे. मनोरंजनासोबतच तुम्हाला तुमचे करियर मिळवून देण्याचा संकल्प वलयांकित करीत आहे. तुमचे छंद करियर मध्ये कसे रूपांतरित करता येतील यावर आपल्या विविध लेखांमधून वलयांकितने चर्चा करण्याचे आयोजिले आहे. कारण, तुम्हाला तुमची खरी ओळख करून देणे हाच वलयांकितचा उद्देश आहे.

तेंव्हा न चुकता वलयांकितमध्ये आपला ई-मेल नोंदवा आणि स्वतःचा शोध घेण्याच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाका.

खाली दिलेल्या काही लोकांनी आपल्या छंदाला करियर मध्ये कसे रूपांतरित केले आहे ते वाचा

1. Travelling –

A) अजय जैन:– एक अवलिया ज्याने अख्ख जग पायाखाली घालायचे ठरवले.. आपल्या अनुभवांना शब्द दिले आणि त्यातूनच जन्माला आले www.kunzum.com.

प्रवास वर्णनासोबतच अजयच्या वेबसाईटवर स्थळांची, प्राणी-पक्ष्यांच्या माहितीची, तिथल्या प्रादेशिक लोकांची माहितीची खाण आहे.. किती भरभरून आयुष्य जगात असेल अजय !

B) शीव्या नाथThe shooting star.com  

आपल्या जवळ असलेले सर्व काही विकून, नौकरीला रामराम ठोकून, जग भ्रमंतीला निघालेली. आज कित्येक नामांकित ट्रॅव्हल ब्रँड्सशी सलंग्न असून आपल्या छंदातून कमाई तर करतेच आहे पण आयुष्य मनमुरादपणे जगण्याचा अनुभवहि घेत आहे.

2. Cooking – अर्चना दोशी

आपल्याला माहित असलेल्या रेसिपीजला सर्व सामान्य महिलांपर्यंत पोहोचविण्याचे साधन म्हणून सुरु झालेली Archana’s Kitchen.  

3. Reading – अमृत देशमुख

आपली वाचनाची आवड जोपासत अमृतने सर्वांना वाचनाचा आनंद देण्याचा ध्यास घेतला. त्यातूनच जन्माला आला आहे बुकलेट हा अँप.
अमृतने http://www.bookletapp.in या आपल्या website वर त्याच्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रवासात अवश्य सोबत ठेवावे असे बुकलेट अँप त्याच्या website वरून डाउनलोड करता येते.

4. Writing – रितिका तिवारी

कार्पोरेट क्षेत्रातला (I.T.) जॉब सोडून लिखाणाकडे वाळलेली रितिका आज एक यशस्वी फ्रिलान्स रायटर आहे. तिच्या वेबसाईट writefreelance.in वर आपल्याला लिखाणासंबंधी मार्गदर्शन मिळते सोबत तिच्या लिखाणकामाची पण माहिती पहायला मिळते.

 

5. M.S.Excel expert – chandoo.org

M.S. Excel चे काम सर्वांनाच पडते. बरीचशी फंक्शन्स आपल्याला माहिती नसतात. अश्या लोकांना एक्सेल चे ज्ञान देण्याचे काम chandoo.org वर चालते. आहे कि नाही क्रिएटिव्ह?

अश्या उपक्रमाची तुम्ही कल्पना हि केली नसेल, इथे या अवलिया ने कल्पना तर केलीच केली पण त्यातून आयुष्यभरासाठी कमाईचीसुद्धा व्यवस्था केली.

 

6. Pet lover – Alistair Fernandes

Fb page – alistairthedogfather/

कुत्रा पाळायचा ठरवला तर त्याला प्रशिक्षण देण्याचे, त्याच्यासाठी काय करावे आणि काय करू नये याचे मार्गदर्शन करण्याचे काम ऍलिस्टर करतो. त्याच्याकडे सामान्य कुत्र्याला खानदानी कुत्रा बनविण्याचे सर्व शिक्षण दिले जाते. आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी लोकांची रांग लागलेली असते.

 

7. Personalized Textile products – भावना जनबंधू

आपला जॉब सोडून भावनाने BJ’s Color N Pattern नावाचा स्वतःचा एक ब्रँड उभा केला आहे. आपल्या युनिक डिज़ाईन्स आणि “BJ’s एम्बो-पेंट” या ट्रेडमार्क पद्धतीने कोणत्याही कपड्याला सुंदर बनवणारी भावना जनबंधू ट्रेंडी कपडे डिजाईन करते.

 

यांचे वैशिष्ट्ये काय आहे?

विविध क्षेत्रातून विविध काम करणारी हि मंडळी. यांच्याकडे मोठं ऑफिस आणि खूप स्टाफ आहे असं काहीच नाही आहे. फक्त एखादी ठराविक आवड / छंद आणि त्यासाठी झोकून देण्याची तयारी एवढ्याच भांडवलावर त्यांनी स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.  लहानपणापासून असे बाळकडू असतील तर आयुष्याची मजाच निराळी.

त्यांनी केलेले अतिशय महत्वाचे काम जे इथे नमूद करावे लागेल ते हे कि त्यांनी आपल्याकडे असलेली माहिती लोकांपर्यंत समजेल अश्या पद्धतीने पोहोचवायची व्यवस्था केलेली आहे.

आजकाल ब्लॉगिंग किंवा यूट्यूब चॅनेल्सची चलती आहे. त्यांचा उपयोग करून आपल्याला कोणत्याही छंदाला व्यावसायिक स्वरूप देता येऊ शकते.

ब्लॉग कसा तयार करायचा किंवा यूट्यूब चॅनेल कसे सुरु करायचे हे येथे वाचा

 

 

विरा !!!

 

%d bloggers like this: