गर्दी……

pexels-photo-813616.jpeg

आपण खूप काही तर करतो आहे परंतु कशासाठी इतका आटापिटा करतोय तेच बऱ्याचदा समजत नाही. अश्याच हरवलेल्या क्षणांमध्ये सुचलेले काही….

गर्दी…., विचारांची गर्दी.
डोळ्यात तरळणाऱ्या स्वप्नांची कधी,
कधी मनात उसळणाऱ्या लाटांची गर्दी।
गर्दी…. विचारांची गर्दी।
स्वतःच्या शोधात रोज बाहेर पडतो,
कधी जग नडतं, कधी माझाच स्वभाव नडतो,
हरवलेलाच मी माघारी घरी परततो.
स्वतःच्या क्षमतेवर मग
येत असलेल्या शंकांची गर्दी,
मनात उसळणाऱ्या…. लाटांची गर्दी।
काल जे हवे होते, आज त्यात मला रस नसतो,
आज जे समोर आहे, मी तिथे समरस नसतो,
ऊर फुटेस्तोवर धावतोय उद्यासाठी,
पण मी नेमका कोण, कुठे पळतोय न का पळतोय,
डोक्यात असंख्य प्रश्नांची गर्दी,
गर्दी….विचारांची गर्दी,
मनात उसळणाऱ्या…. लाटांची गर्दी।
धाव धाव धावतो, घाव घाव झेलतो,
आपली स्वप्न अपूर्ण सोडून
इतरांच्याच अपेक्षा पेलतो.
डोळ्यात अर्धवट राहिलेल्या
कित्येक स्वप्नांची ती गर्दी,
मनात उसळणाऱ्या…. लाटांची गर्दी।

कळवा तुमच्या मनात आहे का अशी प्रश्नांची गर्दी।

वीरा!!!

4 thoughts on “गर्दी……

 • January 24, 2018 at 1:35 pm
  Permalink

  khara ahe….. gardi tar ahe…pan gardit sudha ektach ahe…..ani to ekatepana far bhayankar ahe….konashi spardha kartoy tech mahit bahi….bin shidachya hodi sarkhe…bhatakato ahe….

  Reply
  • January 24, 2018 at 3:32 pm
   Permalink

   खरं आहे उमेश. अश्याच प्रतिक्रिया आल्या आहेत सर्वांच्याच गर्दी बद्दल…. आपण सर्वच जण या प्रश्नाच्या गर्दीत हरवून गेलो आहोत… उत्तर आहे. नक्कीच आहे, पण ते बाहेर नसून आपल्या आत आहे… स्वतः मध्ये झाकून बघावे लागेल. आपली स्वतःशी ओळख होणे जरूरी आहे… Keep reading and interacting.. thank you once again.. regards, vira

   Reply
  • January 25, 2018 at 2:38 pm
   Permalink

   Thank you… Hope we all will solve this questions early in life..

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: