कसं असतं ना आयुष्याचं?

सर्व काही इथेच असतं,
सर्व काही तसंच असतं,
पण तरीही…..
काहीतरी हरवल्याची एक भीती सतत मनात पिंगा घालीत असते.
भीतीपोटी आपण कधी रडतो, चाचपडतो, पुन्हा पुन्हा शोधत…. धडपडतो,
हरवलं काय आहे, ते सुद्धा समजत नाही, शोधायचं काय न कुठे तेच मुळी उमजत नाही.

सर्व काही इथेच असतं,
सर्व काही तसंच असतं,
पण तरीही……
कसं असतं ना आयुष्याचं?

मुलं मोकळा श्वास घ्यायला पाहतात,
अभ्यास अन क्लासच्या रिंगणात फिरत राहतात.
ऑफीस अन घर दोन्ही कसरत आई सांभाळते,
दोन्ही दोन्ही सांभाळण्यात तिची तर फार आबाळ होते,
बाबांचे तर विचारूच नका,
ते इतके कोणासाठी करतात हे त्यांचे त्यांनाच समजत नाही.
शोधायचं काय अन कुठे तेच मुळी उमजत नाही.

सर्व काही इथेच असतं,
सर्व काही तसंच असतं,
पण तरीही……
कसं असतं ना आयुष्याचं?

लाईफ स्टाईल मेंटेन करण्यात लाईफच पूर्ण हरवली आहे,
पैसा पैसा करीत सुटलो पण त्या पैश्यानेच आमची जिरवली आहे.
आजी आजोबा मागेच राहिले, मित्र दोस्तही दुरावले,
लाईक्स अन कंमेंटस च्या गर्दीत मन काही रमत नाही.
शोधायचं काय अन कुठे तेच मुळी उमजत नाही.
सर्व काही इथेच असतं,
सर्व काही तसंच असतं,
पण तरीही……

कसं असतं ना आयुष्याचं?

 

वीरा !!!

मला खात्री आहे, कुणाला तरी हे शब्द फार जवळचे वाटतील, तेंव्हा जरूर शेअर करा !

2 thoughts on “कसं असतं ना आयुष्याचं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: